Utha Utha Sakal Jan Lyrics in Marathi

Utha Utha Sakal Jan Lyrics in Marathi

उठा उठा सकल जन, वाचे स्मरावा गजानन
गौरीहराचा नंदन गजवदन गणपती

ध्यानि आणुनी सुखमूर्ती, स्तवन करा एके चित्ती
तो देईल ज्ञानमूर्ती मोक्ष सुख सोज्वळ

जो निजभक्तांचा दाता, वंद्य सुरवरां समस्तां
त्यासी गाता भवभय चिंता, विघ्‍नवार्ता निवारी

तो हा सुखाचा सागर श्री गणराज मोरेश्वर
भावे विनवितो गिरिधर भक्त त्याचा होउनी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *