Uthi Govinda Uthi Gopala Lyrics in Marathi
उषःकाल झाला, उठी गोविंदा उठी गोपाळा
हलके हलके उघड राजीवा नील नेत्रकमला
तुझ्यापरी बघ जीवनवारा, मिठी मारतो प्राजक्ताला
धवलकेशरी मृदुल सुमांचा पाऊस अंगणी झिमझिमला
पर्णपोपटी हिंदोळ्यावर कंठ फुटतो आनंदाला
तुज भूपाळी आळवित सुंदर चढली गगनी विहंगमाला
गोठ्यामधले मुके लेकरू, पीत झुरुझुरू कामधेनुला
किती आवरू भरला पान्हा, हासवी अरुणा तव आईला