Vayda Kela Visaru Naka Lyrics in Marathi
वायदा केला विसरू नका याद ठेवा पक्की
जमलं तर आज या, न्हाइ तर उद्या नक्की
यावं जरा जपून जपून
परसदारी बसा लपून
पहिलवान दादा माझा ठेवून देइल बुक्की
गुपित ठेवा मनचं मनी
हळूच बोला ऐकल कोणी
चहाडखोर मुलखाची बहिनी माझी सख्खी
अंगरखा जरतारी
फेटा बांधा कोल्हापुरी
थाट बघुन इंद्राची ऐट पडल फिक्की