विठ्ठलाच्या पायी वीट मराठी अभंग लिरिक्स – Vitthalachya payi veet Marathi Abhang Lyrics
विठ्ठलाच्या पायी वीट मराठी अभंग लिरिक्स
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पहाताच होती दंग आज सर्व संत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
युगे अठ्ठावीस उभा विठू विटेवरी
धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी
अनाथांचा नाथ हरी असे दयावंत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
कुठली ती होती माती कोण तो कुंभार
घडविता उभा राही पहा विश्वंभर
तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पाहुनिया विटेवरती विठू भगवंत
दत्ता म्हणे मन माझे होई येथे शांत
गुरुकृपे साधीयला मी आज हा सुपंथ
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत मराठी अभंग लिरिक्स
vitthalachya payi veet jhali bhagyawant Marathi Abhang Lyrics
0watch?v=7QR_63iprL0