Ya Bai Ya lyrics in Marathi
या बाइ या,
बघा बघा कशि माझि बसलि बया.
ऐकुं न येतें,
हळूहळू अशि माझि छबि बोलते.
डोळे फिर्वीते,
टुलुटुलु कशि माझि सोनि बघते.
बघा बघा तें,
गुलुगुलु गालातच कशि हंसते.
मला वाटतें,
इला बाइ सारें कांहिं सारें कळतें.
सदा खेळते,
कधिं हट्ट धरुनि न मागे भलतें.
शहाणि कशी !
साडिचोळि नवि ठेवि जशिच्या तशी.